आज देश 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवणार आहेत. यानंतर ते देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून सलग दहावे भाषण असेल. दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। आइए, इस ऐतिहासिक अवसर पर अमृतकाल में विकसित भारत के संकल्प को और सशक्त बनाएं। जय हिंद!
Best wishes on Independence Day. We pay homage to our great freedom fighters and reaffirm our commitment to fulfilling their vision. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केला मणिपूरचा उल्लेख
“यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी संकटे निर्माण झाली. ज्या कुटुंबांना हा त्रास सहन करावा लागला आहे त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्यांची संकटातून मुक्तता करेल. मी खात्री देतो गेल्या आठवड्यात ईशान्य भागात, विशेषतः मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अनेकांचा बळी गेला. आई आणि मुलींच्या अब्रुसोबत खेळले गेले. गेल्या काही दिवसांपासून शांतता असल्याच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जो मार्ग धरला होता तोच मार्ग अवलंबा. देश तुमच्या पाठीशी आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी राज्ये आणि केंद्र एकत्रित प्रयत्न करत राहतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.