Breaking News

शहरात हलक्या पावसाच्या सरी

378 0

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

पुढील तीन दिवस ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. कमाल तापमानाचा पारा 35 अंशावर पोहोचला होता, मात्र बुधवारी दुपारनंतर पाऊस पडल्यामुळे वातावरण थंड झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!