Yami-Gautam

Yami Gautam : ‘काही जण एका रात्रीत…’, यामी गौतमचे ‘ते’ ट्विट चर्चेत

826 0

मुंबई : ‘विकी डोनर’, ‘दसवी’, ‘बदलापूर’, ‘भूत पोलीस’, ‘काबील’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने चाहत्यांच्या मनात स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच ती (Yami Gautam) ‘OMG 2’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी करताना दिसत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका युजरने अभिनेत्रीला अंडर युटिलाइज्ड म्हटलं आहे. याचा अनुभव यामी गौतमने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

युजर अभिनेत्रीला म्हणाला अंडर युटिलाइज्ड
‘यामी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाने चाहत्यांना हैराण करते ही थक्क करणारी गोष्ट आहे. ‘OMG 2’ यासाठी अपवाद नाही. यामी स्वतःच्या फ्रेमची मालकीण आहे. तिचा शांत स्वभाव देखील खूप काही सांगून जातो. मला ‘अंडरेटेड’ शब्दाचा तिरस्कार आहे. मी एवढेच म्हणेन की आपला सिनेमा निर्मात्यांनी तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही..’ असे एका युजरने म्हंटले आहे.

युजरच्या ट्वीटवर यामी गौतमने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
आपल्या चाहत्याच्या ट्विटवर यामी गौतमने प्रतिक्रिया देताना म्हंटले कि, ‘इंडस्ट्रीमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी एक रात्रीत यश मिळालं, तर काही लोकांना मात्र अनेक वर्ष स्वतःला सिद्ध करावं लागतं. काही लोकं स्वतःच्या कौशल्याचा मार्केटिंग अगदी व्यवस्थित करतात. काही लोकांना फक्त त्यांच्या कौशल्यावर बोलायला आवडतं. एक अभिनेत्री म्हणून मी फक्त अभिनयावर लक्ष केंद्रीत करते..’

तसेच ‘मी उत्तम स्क्रिप्ट आणि भूमिकांची ओळख करण्यावर मेहनत घेते आणि हेच माझं कौशल्य आहे. मला माझ्या कौशल्याच्या मार्केटिंगमध्ये फारसं काही कळत नाही किंवा मी त्यात गुंतत नाही. दुर्दैवाने, आपल्या इंडस्ट्रीतील बहुतेक लोकांसाठी, सर्व काही एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रोजेक्टच्या मार्केटिंगवर अवलंबून असतं, कदाचित याच कारणामुळे माझ्यावर लोकांचं लक्ष नसतं.. यानंतर तिने युजरचे आभार देखील मानले आहेत. ‘तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानते.. मी खरंच उत्साही झाली आहे…’ सध्या तिच्या या ट्विटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!