Tanaji Sawant

Tanaji Sawant : कळवा रुग्णालयातील18 जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

836 0

पुणे : कळवा रुग्णालयाच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा (Tanaji Sawant) अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 12 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचाअहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

नेमके काय म्हणाले तानाजी सावंत?
ठाणे रुग्णालयातील घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवालएक ते दोन दिवसांत येईल. 13 जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर 4 हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे. चौकशी समितीचा अहवाल येताच याबाबत कारवाई करण्यात येईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघेही या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती तानाजी सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!