नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर खेळवला गेला. भारत आणि मलेशिया (India vs Malaysia Final) यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने मलेशियावर मात करत आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे.
We're back in business💪💙
Akashdeep Singh strikes the 4th goal, staging a late and thrilling comeback🇮🇳 India 4-3 Malaysia 🇲🇾#HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 @CMO_Odisha @CMOTamilnadu @asia_hockey @IndiaSports @Media_SAI @sports_odisha
— Hockey India (@TheHockeyIndia) August 12, 2023
अंतिम सामन्यात नेमकं काय झाले ?
अंतिम सामन्यात मलेशियाने वेगवान सुरुवात केली पण पहिला गोल भारताने केला. 9 व्या मिनिटाला संघाला पेनल्टी मिळाली. जुगराज सिंगने पेनल्टी घेत गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताला दोन पेनल्टी मिळाल्या मात्र संघाला त्याचा फायदा उचलण्यात अपयश आले. अबू कमाल अझराईने 14व्या मिनिटाला संघासाठी गोल केला आणि स्कोअर 1-1 झाला. दुसऱ्या क्वार्टरच्या 17 व्या मिनिटाला मलेशियाच्या संघाने दुसरा गोल नोंदवला. दुसऱ्या क्वार्टरच्या 27 व्या मिनिटाला मलेशियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला. तिसरा गोल करत मलेशियाने 1-3 ने आघाडी घेतली आणि टीम इंडिया पराभवाच्या छायेखाली आली.
The chants of Vande Mataram fill the stadium after India comes back into the game. #HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 pic.twitter.com/Mn5ccxSG4A
— Hockey India (@TheHockeyIndia) August 12, 2023
यानंतर उत्तरार्धात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं. तिसऱ्या क्वार्टरअखेर भारताने काही सेकंदात दोन गोल केले. पहिला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यानंतर गुरजंत सिंगने लगेच गोल केला अन् भारत आणि मलेशियाचा स्कोअर 3-3 असा झाला. आकाशदीप सिंगने 56व्या मिनिटाला संघासाठी विजयी गोल करत भारताला अशक्य असा विजय मिळवून दिला.
भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने 3 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मलेशियाचा हा पहिलाच अंतिम सामना होता. याआधी भारताने 2011, 2016 आणि 2018 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते. तब्बल पाच वर्षानंतर भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे.