sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

735 0

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते. तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या निमित्तानं पुण्यात राजकीय घडामोडी वाढणार असा अंदाज होता.

यादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोरेगाव पार्क येथील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यामध्ये बैठक झाली. कोरेगाव पार्क मधील बंगला क्रमांक 73 मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले. त्यानंतर सरकारी ताफा त्याच ठिकाणी ठेऊन अजित पवार खासगी वाहनाने कोरेगाव पार्क याठिकाणी पोहचले.

यादरम्यान शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठक मधेच सोडून निघाले होते. यावेळी जयंत पाटील हे देखील बैठकीमधून बाहेर पडत शरद पवार यांच्यासोबत निघाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Share This News
error: Content is protected !!