Satara Crime News

Satara Crime News : वाई बसस्थानकात 13 वर्षीय मुलीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

742 0

सातारा : साताऱ्यातील वाई बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7वी इयत्तेतील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून मृत्यू झाला आहे. श्रावणी अहिवळे असे त्या मृत विद्यार्थीनीचे नाव असून शाळा सुटल्यावर गर्दीमुळे धक्का लागल्यामुळे ती चाकाखाली चिरडली गेली.

मृत श्रावणी ही वाई तालूक्यातील सुलतानपुरची असून या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत श्रावणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने संपूर्ण वाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!