NIA

NIA : ISIS मॉड्युल प्रकरणात NIA मोठी कामगिरी; आरोपी शमील साकिब नाचनला अटक

525 0

पुणे : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपी शमील साकिब नाचनला अटक केली आहे. या प्रकरणात एनआयएने केलेली ही सहावी अटक आहे.

ISIS मॉड्युल प्रकरणात आणखी एकाला अटक
शमील हा जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे ‘सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य होते आणि ते फरार होते. एनआयएने एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात त्यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते. ISIS चे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही याची मुख्य जबाबदारी होती.

काय आहे ISIS?
ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS) किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL) किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) किंवा Daish किंवा इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP) किंवा ISIS विलायत खोरासान किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक म्हणून देखील ओळखले जाते.

Share This News
error: Content is protected !!