Womens Cricket Team

BCCI : महिला सामन्यांच्या मीडिया राइट्सबाबत BCCI ने उचलले ‘हे’ पाऊल

848 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील 5 वर्षांसाठी भारतात होणाऱ्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविण्यासाठी, गेल्या आठवड्यात मीडिया हक्क निविदा जारी केल्या आहेत. यामध्ये आता बीसीसीआयकडून (BCCI) पुरुष संघाच्या सामन्यांचे हक्क मिळविणाऱ्या कंपनीला महिला क्रिकेट सामन्यांचे हक्क मोफत मिळणार आहेत.महिलांच्या सामन्यांबाबत बोर्डाकडून कोणतेही वेगळे पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. महिलांच्या सामन्यांबाबत बोर्डाकडून कोणतेही वेगळे पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही.

मंडळाने जारी केलेल्या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. यावेळी लिलाव प्रक्रिया ई-ऑक्शनद्वारे पार पडणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या निविदांमध्ये रणजी ट्रॉफी, इराणी चषक, दुलीप ट्रॉफी आणि इतर मोठ्या स्पर्धांसह देशांतर्गत क्रिकेटच्या अनेक मालिकांचा समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी स्वतंत्र निविदा न काढण्याच्या बोर्डाच्या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास भारत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांचे यजमानपद भूषवणार आहे. पुढील तीन वर्षांत द्विपक्षीय मालिका होणार आहेत. बीसीसीआयने जारी केलेल्या निविदेत फक्त पुरुष क्रिकेटची बोली लावली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!