Buldhana News

Buldhana News : ‘या’ भाजप नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

719 0

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Buldhana News) एका युवा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असताना त्याला मृत्यूने गाठले. डॉ. प्रशांत प्रभाकर ताठे असे अपघातात मृत्यू पावलेल्या डॉक्टरचे नाव होते. ते भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाचे सुपुत्र होते.

काय घडले नेमके?
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील रहिवासी डॉ. प्रशांत प्रभाकर ताठे यांचा नऊ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अपघात झाला. ट्रक व दुचाकी यांच्या धडकेत डॉक्टर गंभीर जखमी झाले होते, मात्र जालना येथे उपचारादरम्यान काल रात्री 2 च्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बस स्थानकाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना बाजूला उभे असलेल्या टेम्पोला धक्का लागून नंतर ट्रकवर धडकून हा विचित्र अपघात झाला.

अडगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ . प्रशांत प्रभाकर ताठे (वय 36 वर्ष) हे अडगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत घरी येत असताना दुसरबीड बस स्थानकावर एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. रस्त्यावर पडून ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!