Raghav Chadha

Raghav Chadha : ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

712 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर (Raghav Chadha) खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच दुसरीकडे संजय सिंह यांच्या निलंबनामध्ये वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम ठेवलं जाईल असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे.

‘या’ कारणामुळे करण्यात आले निलंबन?
पाच खासदारांचा असा दावा आहे की, दिल्ली सेवा विधेयकाला त्यांच्या संमतीशिवाय निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी सादर केला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये तीन भाजपा खासदार, एक बीजेडीमधील आहे. याशिवाय अण्णाद्रुमूकच्याही खासदाराचा समावेश आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीची मागणी केली होती.

Share This News
error: Content is protected !!