Parbhani News

Parbhani News : बोअरवेलमध्ये पडलेला ‘तो’ चिमुकला सुखरुप; तब्बल 6 तास चालले बचावकार्य

585 0

परभणी : परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Parbhani News) मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील बालक सोहम उर्फ गोलू सुरेश उक्कलकर हा 4 वर्षीय चिमुकला शेतातील पडिक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. यानंतर याची माहिती तातडीने अग्निशमन दल आणि प्रशासनाला देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आणि प्रशासनाचे विविध पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या मुलाच्या बचावाचे प्रयत्न सुरु करण्यात आले. तब्बल 6 तासांनंतर या चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश आले. सोहम आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. खेळत खेळत तो जवळच्या बोअरमध्ये पडला.

सोहम 20 फूट अंतरावर अडकला असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहळ, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार मंडल अधिकारी यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. तब्बल सहा तासांनंतर सोहमला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide