Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान लोखंडी भाग कारच्या बोनेटवर पडून भीषण अपघात

894 0

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) स्टेशनचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना काल येरवडा या ठिकाणी एक भीषण दुर्घटना घडली आहे. पुणे मेट्रो (Pune Metro) स्टेशनचे काम सुरु असताना एक लोखंडी भाग खालून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दुर्घटना काल रात्री 8 च्या सुमारास घडली.

काय घडले नेमकं?
येरवडा भागात मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना एक लोखंडी भाग खालून जाणाऱ्या कारवर पडला. हा लोखंडी भाग एखाद्या पादचारी अथवा दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने चारचाकीच्या बोनेटवर हा लोखंडी भाग पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला आहे.

नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचे (Pune Metro) काम सुरु आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आम्ही त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. चौकशीनंतर नेमकी ही घटना कशी घडली, याची माहिती समोर येईल. सध्या या व्यतिरिक्त कोणतही माहिती आमच्याकडे नाही असे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!