Nandurbar News

Nandurbar News : शासकीय आश्रमशाळेत चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

724 0

नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Nandurbar News) जिल्ह्यातील तोरणमाळ येथील इयत्ता पहिलीत शिक्षण घेणारा शासकीय आश्रमशाळेतील एका 6 वर्षीय विद्यार्थ्याचा आश्रमशाळेत झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
डेबा दिला पाडवी (वय 6) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तो तोरणमाळ येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता. तो सोमवारी दुपारी अचानक आजारी पडला. या विद्यार्थ्यांचे पोट दुखत होते असे सांगण्यात आले. मात्र, मंगळवार डेबा पाडवी झोपेतच मृत झाल्याची माहिती समोर आली आणि आश्रमशाळा प्रशासनाला मोठा धक्का बसला. यानंतर संबंधित आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या आई-वडिलांना याची माहिती दिली.

सदर प्रकार बघितल्यानंतर पालक व नातेवाइकांनी आश्रमशाळेच्या प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. जबाबदार अधिकारी आल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, के. सी. कोकणी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा यांनी तोरणमाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन पालकांची व नातेवाइकांची समजूत घातली. तसेच मृत विद्यार्थ्याबाबत पूर्ण चौकशी केली जाईल यानंतर पालकांनी शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा व म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या उपस्थितीत तोरणमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!