Mumbai High Court

Pune News : फुरसुंगी आणि ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या भवितव्याचा निर्णय 21 ॲागस्टला

587 0

पुणे : महापालिका हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना वगळण्याचा आणि या दोन गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्याच्या प्रक्रियेला खो बसण्याची शक्यता आहे. गावे वगळण्याची अधिसूचना राज्य शासनाने गुरुवारी दुपारपर्यंत मागे घ्यावी अन्यथा न्यायालय त्याबाबत निर्णय घेईल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गावे वगळण्याची प्रक्रिया अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपरिषदेच्या भवितव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर आज (गुरुवार) निर्णय होणे अपेक्षित होते मात्र या प्रकरणावर सुनावणी झाली पण कोणता निर्णय नाही झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ॲागस्टला पार पडणार आहे.

पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, प्रशांत बधे, रणजित रासकर, अमोल हरपाळे यांनी राज्य सरकारच्या स्वतंत्र नगरपरिषदेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

Share This News
error: Content is protected !!