देशभर सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. आज या पाचही राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल लागत आहे.
पाच राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हे देखील तब्बल 90 जागांवर आघाडीवर असून आत्ता दिल्लीनंतर पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री असणार आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला.साखर वाटप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला .
या वेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.