Crime News

Crime News : लोकांच्या ‘त्या’ त्रासाला वैतागून आरोपीने बायकोची हत्या करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला; पण…

850 0

बंगळुरू: बंगळुरूमध्ये (Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या पत्नीची हत्या (Crime News) करून पतीने पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. काही जण पत्नीला चोर म्हणायचे. त्यामुळे पती नाराज झाला होता. त्याशिवाय त्याच्या डोक्यावर 11 लाख रुपयांचं कर्ज होतं. त्याची परतफेडही त्याला जमत नव्हती. त्यामुळे त्याने हे टोकाचे उचलायचे ठरवले.

काय घडले नेमके?
सरिता (35) असे मृत महिलेचे नाव आहे तर थरानाथ (37) असे आरोपी पतीचे नाव आहे. हे दोघेही मूळचे मंगळुरुचे रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच दोघे बंगळुरूत स्थायिक झाले. मंगळुरुत असताना सरितावर चोरीचा आरोप झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सरिताला चोर म्हणून हिणवलं जात होते. यामुळे हे दोघेजण बंगळुरुत आले. पण तिथेही जोडप्याच्या ओळखीचे काही जण राहत होते. ते सरिताला चोर म्हणून हिणवायचे. या सगळ्याला दोघेही वैतागले होते.

Jalgaon Crime : शिंदे गटाच्या आमदाराच्या समर्थकांकडून पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण

आरोपी पतीवर 11 लाखांचं कर्ज होतं. त्याची परतफेड करणं त्याला जमत नव्हतं. तो बंगळुरूत पाणीपुरीचं दुकान चालवायचा. पत्नीला मिळणारी वागणूक आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर याला कंटाळून त्याने सरितासह स्वत:ला संपवण्याचं (Crime News) ठरवलं. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यानं सरिताची दोरीनं गळा आवळून हत्या केली. ही हत्या केल्यानंतर आरोपी पती मृतदेहाजवळ काही तास बसून राहिला. त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा धीर झाला नाही. यानंतर त्याने घरमालकाला सगळा प्रकार सांगून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!