महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या दोन व्यक्ती म्हणजे नृत्यांगना माधुरी पवार आणि गौतमी पाटील (Gautami Patil Vs Madhuri Pawar). या दोघींनीही नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी (Gautami Patil Vs Madhuri Pawar) त्यांच्या नृत्यांतून जनतेची मनं जिंकली आहेत. या दोघींचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण जर कधी या दोघी आमनेसामने आल्या तर? चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच असेल.
https://www.instagram.com/reel/Cvm_jzgodPu/?utm_source=ig_embed&ig_rid=f282dc88-afa4-4fa3-b163-9f6e455d6072
आतापर्यंत तुम्ही गौतमी आणि माधुरी यांना तुम्ही वेगवेगळ्या मंचावर पाहिले आहे. पण नुकतेच, इतिहासात पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या. त्या हडपसर येथील ‘टिओस कॅफे’चे उद्घाटनाच्या कार्यक्रमात एकाच स्टेजवर आल्या होत्या. माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसेच दोघींचीही नृत्य सादर करण्याची शैली देखील एक्दम वेगळी आहे.
स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे. ती झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोची विजेतीसुद्धा आहे. तर दुसरीकडे गौतमीने सादर केलेल्या डान्सने देखील सर्वांची मने जिंकली आहेत. कोणीही गॉडफादर नसताता गौतमीने तिच्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्रातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले आहे. या दोघांच्या परफॉर्मन्सने सगळ्यांची मने जिंकली आहेत.