Threatening Mail

Threatening Mail : खळबळजनक ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा ‘तो’ मेल हॉस्पिटलला नसून एका व्यक्तीला आला; पुणे पोलिसांनी केले स्पष्ट

589 0

पुणे : पुण्यात दहशतवादी कारवायांचा कट उघड झाला असतानाच अजून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील
राहुल तायाराम दुधाणे यांना आपल्या सोशल मीडियावरील हिंदुत्वाशी संबंधित ब्रॉडकास्ट साइटवर मोखिम या नावाच्या जीमेल वरून धमकीचा मेसेज (Threatening Mail) आला आहे.

एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी (Threatening Mail)  देण्यात आली आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने ईमेलमध्ये म्हटले आहे. मी भारतामध्ये सीरियल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे. मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, असेही धमकी देणाऱ्याने ईमेलमध्ये म्हटले आहे.

कोण आहे धमकी देणारा?
देशातील विविध ठिकाणी बॉम्बब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याऱ्याची ओळख पटली आहे. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पुण्यातील एका व्यक्तीलाही धमकीचा मेल केल्याची माहिती समोर आली आहे. ‘मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी मृत्यूंचा तांडव घडवून आणणार असल्याचे आरोपी मोखीम याने पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

पोलिस यंत्रणा अलर्ट
पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमद्वारे शहर तसेच जिल्ह्यातील पोलिसांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!