Drink Girl Video

Drink Girl Video : दारूच्या नशेत तरुणीचे भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; लोकांनी व्यक्त केला संताप

1013 0

लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही? याचा काही नेम नाही. काही लोक दारूच्या नशेत रस्त्यावर हुल्लडबाजी (Drink Girl Video) करताना दिसतात, तर काही लोक सामान्य नागरिकांशी विनाकारण वाद घालताना दिसतात. सोशल मीडियावर दारूड्यांचे अनेक व्हिडिओ (Drink Girl Video) आपण पाहत असतो. सध्या सोशल मीडियावर बंगळुरूमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये दारूच्या नशेत एक तरुणी भांडताना दिसत आहे. शिवाय यावेळी तिथे काही पोलीस भांडण मिटवण्यासाठी येतात तेव्हा ती त्यांनाही शिवीगाळ करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

काय घडले नेमके?
बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीटवर अनेक पब आणि नाईट क्लब आहेत, त्यामुळे या भागातील काही लोक दारू पिऊन (Drink Girl Video) कायदा मोडतात आणि रस्त्यावर गोंधळ घालताना आढळतात. रविवारी अशीच एक तरुणी दारूच्या नशेत पार्किंगमध्ये गेली असता तिचे तेथील लोकांशी भांडण सुरु झाले. पोलिसांनी नो पार्किंगमध्ये ध्ये उभी केलेली कार पार्किंगमध्ये नेण्यास सांगितल्यावर तिने चक्क पोलिसांशी बाचाबाची करायला सुरुवात केली. पोलिसांशी वाद घालत असताना ही तरुणी इतर लोकांना मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, या तरुणीवर गुन्हा दाखल झाला की नाही हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दारुच्या नशेत पोलिसांशी गैरवर्तन करणे किंवा नो-पार्किंग झोनमध्ये वाहन चालवल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!