Eye Flu

Eye Flu : चिंताजनक ! डोळ्यांच्या साथीमुळे पसरली दहशत; यामध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ?

487 0

सध्या राज्यभरात डोळ्यांची साथ (Eye Flu) पसरल्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून याबाबत खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्दी खोकल्याच्या रुग्णांसोबतच सध्या डोळे येण्याच्या (Eye Flu) रुग्णांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या लहान-मोठे सर्वांमध्ये ही साथ पसरली आहे. या साथीमध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यावी. यापासून लहान मुलांचं संरक्षण कसं करावं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

कसा होतो डोळ्यांचा संसर्ग ?
डोळ्यांचा संसर्ग होणे, या कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) आणि डोळे येणे किंवा पिंक आय असंही म्हणतात. या डोळ्याच्या संसर्गामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते. कंजंक्टिवा हा डोळ्यातील एक थर आहे जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतमध्ये असतो, याला संसर्ग झाल्यास डोळे लाल होतात आणि जळजळ होते, यालाच आपण डोळे येणे किंवा आय फ्लू (Eye Flu) असं म्हणतो. आय फ्लूमध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागात संसर्ग पसरतो. त्यामुळे रुग्णाला पाहताना खूप त्रास होतो.

पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण वाढतं
सामान्यापणे पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण वाढते. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात कमी तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे लोक जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीच्या संपर्कात येतात. या ऍलर्जी प्रतिक्रिया आणि संक्रमणांमुळे डोळ्यांनाही संसर्ग होतो.

डोळ्यांच्या साथीपासून लहान मुलांचं ‘असं’ संरक्षण करा
मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.
मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.
मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
ते शक्या नसेल तर, मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.
शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.
स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.
संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.
मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.

Share This News
error: Content is protected !!