Hinjawadi Crime News

Hinjawadi Crime News : हिंजवडीमधून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ IT इंजिनिअरचा सापडला मृतदेह

42336 0

पुणे : पुण्यातील हिंजवडीमधून (Hinjawadi Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी (Hinjawadi Crime News) फेज एक येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील सांडभोरवाडी या ठिकाणी आढळून आला. हा तरुण 28 जुलै पासून बेपत्ता होता. सौरभ नंदलाल पाटील (वय 23, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सौरभ हा हिंजवडी (Hinjawadi Crime News) फेज एक येथील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होता. 28 जुलै रोजी तो दुचाकीवरून कंपनीत कामासाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो माघारी परतलाच नाही. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

यानंतर 5 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे वन विभागाच्या जागेत पुणे-नाशिक महामार्गालगत डोंगर उताराला सौरभ याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सौरभचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!