Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre

Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre : ‘आज आमची जहागिरी आहे’; अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये खडाजंगी

685 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोज राडा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकीत मोठा गोंधळ (Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre) झाल्याचे आज पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी निधी मिळत नाही अशी तक्रार केल्यानंतर या बैठकीमध्ये मोठा गोंधळ उडाला. या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यात चांगलीच खडाजंगी (Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre) पाहायला मिळाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झाले होते. यावेळी संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात जोरदार बाचाबाची सध्या या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकी कोणत्या आमदारांना निधी देण्यात यावा याविषयी चर्चा सुरु होती. यावेळी ठाकरे गटाकडून आम्हाला निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आमदार उदयसिंह राजपूत यांनी तक्रार करताच अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले. यानंतर स्टेजवरच पालकमंत्री आणि दानवे यांच्यात वाद सुरु झाला.

यावेळी अंबादास दानवे यांनी खुर्चीवरून उठत ठाकरे गटाच्या आमदारासोबत बाचाबाची केली. जवळपास पाच ते दहा मिनिट हा सगळा प्रकार सुरु होता. त्यानंतर अधिकांऱ्यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!