Agricultural Dispute

Agricultural Dispute : भंडारा हादरलं ! पुतण्याने भररस्त्यात ‘या’ कारणामुळे केली काकूची हत्या

4439 0

भंडारा : आजकाल शेतीवरून मोठ्या प्रमाणात वाद (Agricultural Dispute) पाहायला मिळत आहेत. हे वाद एवढे टोकाला जातात कि यामध्ये लोक आपल्याच माणसांचा जीव (Agricultural Dispute) घेतात. अशीच एक हादरवून टाकणारी घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे. शेतीच्या जुन्या वादातून डोक्यात सल ठेवून चुलत पुतण्याने आपल्या वृद्ध काकूचा गळा आवळून खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पुतण्याला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
देवलाबाई किसन गेडाम (55) राहणार गोंदीदेवरी तालुका लाखनी असे मृत महिलेचे नाव आहे. तर स्वप्निल अभिमान गेडाम (31) राहणार किटाडी तालुका लाखनी असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देवलाबाई गेडाम या रानभाज्या गोळा करण्याचे काम करायच्या. त्यांचा विवाह किटाडी इथल्या गेडाम परिवारात झाला होता. लग्नानंतर दोन ते तीन वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या माहेरी गोंदीदेवरी येथे राहत होत्या. परंतु सासरच्या सामूहिक जमिनीवर वारसा हक्काने देवलाबाई यांचेही नाव होते. त्यामुळे या जमिनीच्या हक्कदार होत्या. यावरुनच त्यांचा चुलत दीर अभिमान जयराम गेडाम यांच्यासोबत त्यांचा वाद होता.

मृत देवलाबाई यांना कोणतेही अपत्य नव्हते. तसेच त्यांना त्यांच्या सासरच्या चुलत परिवाराला जमिनीचा हक्क द्यायचा नव्हता. गेडाम परिवाराने याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे जमिनीच्या वादावर (Agricultural Dispute) न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. मात्र अभिमान गेडाम यांचा मुलगा स्वप्निल याने जमिनीच्या वादातून रागाच्या भरात देवलाबाई यांची हत्या केली. त्याने देवलाबाई यांना कानाखाली दोन तीन चापटी मारल्या आणि बुक्क्या मारून जमिनीवर पाडले. त्यानंतर देवलाबाई यांचे नाक, तोंड आणि गळा दाबून त्यांचा खून केला.

Share This News
error: Content is protected !!