Pune Van News

Pune News : दे धक्का ! चिखलात अडकलेल्या स्कूल व्हॅनला धक्का देताना शालेय विद्यार्थ्यांची दमछाक

527 0

पुणे : एकीकडे पुणे स्मार्ट सिटी (Pune News) म्हणून विकसित होत असताना दुसरीकडे अपुऱ्या आणि नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचे पुण्यात (Pune News) मोठे हाल होत आहेत. असाच खराब रस्त्यांचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. बाणेर परिसरात एक चिखलात रुतलेली स्कूल व्हॅन शालेय विद्यार्थ्यांनाच धक्का मारून बाहेर काढावी लागली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रोड, सर्व्हे नंबर 31, 2 ब अथश्री सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर ही घटना घडली. दुपारी 2 ते अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ काढला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांना आणि व्हॅन चालकांना चिखलात रुतलेली व्हॅन काढायला कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या समस्येमुळे या भागातील नागरिक अनेक दिवसांपासून वैतागलेले आहेत. या रस्त्याचे अद्यापपर्यंत डांबरीकरण झालेलं नसल्याने पावसात नागरिकांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत.रस्त्याच्या समस्येबाबत या भागात रस्त्यांवर स्ट्रीट लाइट नाही, त्यामुळे मुलींना संध्याकाळी 7 नंतर घराच्या बाहेर पडणं देखील मुश्कील झालं आहे. बाणेर मधल्या एका घटनेवरून लक्षात येतंय की स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यात रस्त्यांची किती दुरवस्था आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रशासन मात्र या कडे कानाडोळा करत आहे.

Share This News
error: Content is protected !!