Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्री होणार का? अजित पवार म्हणतात.. आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?

966 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक, शरद पवार यांच्या गटातून जयंत पाटील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात येणार का? या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पुण्यात साखर संकुलात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, हेदेखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील साखर कारखान्यांबाबत अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आढावा घेतला. सहकार क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

यादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री होणार का? असे विचारले असता ते म्हणाले आता मी स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? असे म्हणाले. तसेच राज्याचा विकास करण्यासाठी मी भाजपसोबत आलो आहे. सध्या देशाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणताच नेता मला दिसत नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!