Rajni Patil

Rajani Patil: काँग्रेस खासदार रजनी पाटील यांचे निलंबन मागे

3220 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आजच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

‘या’ कारणामुळे रजनी पाटील यांना केले होते निलंबित ?
रजनी पाटील सभागृहाच्या कामकाजाचं मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होत्या जे कि सभागृहाच्या नियमांना अनुसरून नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. राज्यसभेचे तत्कालीन सभापती जगदीप धनखर यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांचे निलंबन केले होते. आता ते निलंबन मागे घेण्यात आले आहे.

रजनी पाटील कोण आहेत?
सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधल्या त्यांच्या विश्वासू नेत्या अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. हिंगोलीतून खासदार राहिलेले स्व. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेस हायकमांडने रजनी पाटील यांना संधी देऊ केली होती. यापूर्वी त्या 11 व्या लोकसभेत बीडमधून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. राज्यसभेतील त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट पदार्पण संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!