Breaking News

वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का… ; अखिलेश यादव यांचं सूचक ट्विट

358 0

देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये जनमत कोणाच्या बाजूने असेल ते गुरूवारी सकाळीच समजू लागले. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले. सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सुरूवातीचे कल हाती येत असताना सूचक ट्वीट केलं.

धैर्याची मुख्य परीक्षा अजून शिल्लक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुकपणे कार्यरत राहिल्याबद्दल सपा आणि मित्रपक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्यांचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे शिपाई’ आता विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच परततील, अशा आशयाचं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं.

Share This News
error: Content is protected !!