Pune Fight Video : पुणे रेल्वे स्टेशनवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण (Pune Fight Video) झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Fight Video) प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हाणामारी करणार्या दोघांमधील एक जण दुसर्याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता आणि खाली पडणार्या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1687772935229235200
या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
