Nashik News

Nashik News : पत्नी अन् 13 महिन्यांच्या मुलाला वाऱ्यावर सोडत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

738 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या संसार अर्ध्यावर सोडून एका तरुणाने आपल्या आयुष्यचा शेवट केला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी (Nashik News) पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित प्रकाश कुमावत उर्फ बेलदार (वय 27, रा.आशीर्वाद ग्लोरी, बळी महाराज मंदिराजवळ, साईकृपा नगर, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
रोहित कुमावत हा शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभागात काम करत होता. बुधवारी जेव्हा तो घरी आला तेव्हा घरी कोणीही नव्हते. यावेळी त्याने घरात कोणीही नसताना घरीच हाताला सलाईन लावून घेत त्यातून इंजेक्शनद्वारे भुलीचा ओव्हरडोस घेतला. गुरुवारी सकाळी त्याची हॉस्पिटलमध्ये ड्युटी होती. मात्र, तो ड्युटीवर आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो घरी बेशुद्धावस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.

रोहितने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या माघारी आई, पत्नी आणि एक 13 महिन्यांव्हा मुलगा आहे. या घटनेमुळे रोहितच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!