ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

Rahul Gandhi : राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार; राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.

काय होते प्रकरण?
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आता निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.