मुंबई : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर (Jaipur Express Firing) हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अखेरचा निर्णय आणि सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना हलकी हत्यारे देण्याचा निर्णय
मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारच्या (Jaipur Express Firing) घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना AK47 किंवा AR गन यांसारखे स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे. यानंतर सर्क्युलर जारी करण्यात येईल.
चेतन सिंहच्या सहकाऱ्यांची होणार चौकशी
जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबार (Jaipur Express Firing) प्रकरणात आरोपी आरपीएफ शिपाई चेतन सिंह याच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन आरपीएफ जवानांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चेतनने गोळीबार केल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घाबरुन स्वत:ला टॉयलेटमध्ये बंद करुन घेतलं होते अशी माहिती समोर आली आहे.