DRDO

Pradeep Kurulkar News Update: डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट, तपासात धक्कादायक माहिती समोर

627 0

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे (DRDO) पुण्याचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar News Update) प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांनी आपल्या मोबाइलमधील डेटा डिलीट केला होता ही माहिती तपासातून समोर आली आहे.

त्यांनी जो डेटा डिलीट केला होता त्यामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसंच पाकिस्तानी तरुणी झाराशी केलेल्या चर्चांचे चॅटिंग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कुरुलकर यांच्याकडे असलेला मोबाईलचा डेटा रिट्रीव्ह करण्याचे काम सुरू आहे. गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी मोबाइल पाठवण्यात आला आहे.

डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पुण्यामधून ही अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप कुरुलकर हे एटीएसच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!