OMG 2

OMG 2 Trailer: बहुचर्चित OMG 2 चा ट्रेलर प्रदर्शित; अक्षयचा रोल बदलला, महादेवाच्या नाहीतर ‘या’ भूमिकेत दिसणार

491 0

बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित OMG-2 चा ट्रेलर (OMG 2 Trailer) आज प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आलेल्या OMG चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 11 ऑगस्ट 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्षित होणार आहे. 11 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या गदर-2 सोबत अक्षय कुमारचा OMG-2 रिलीज (OMG 2 Trailer) होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, यामी गोतम आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. OMG-2 चित्रपटाची कहाणी ही भगवान महादेवाचा कट्टर भक्त कांती शरण मुद्गगल यांच्याभोवती फिरताना दिसते.

काय आहे चित्रपटाची कथा?
एका सर्वसामान्य कुटुंबातील कांतीशरण एका मोठ्या समस्येत अडकतो त्याच्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी महादेव रक्षणासाठी येतात, अशी चित्रपटाची कथा आहे. कांतीशरण मुद्गगल यांचा मुलगा विवेकवर अनैतिक वर्तनाचा आरोप केला जातो. त्यामुळं त्याला शाळेतून काढून टाकण्यात येते. मुलाच्या वर्तनामुळं अडचणीत सापडलेले कांती शहर सोडण्याचा निर्णय घेतात. त्याचवेळी अक्षय कुमार त्यांना त्यापासून परावृत्त करतो व खऱ्या मार्गावर चालण्याचा सल्ला देतो. त्यानंतर कांती सर्वांना कोर्टात खेचतात. मात्र कांती मुलाला न्याय मिळवून देतील का? ते केस जिंकतील का? हे सर्व चित्रपट रिलीज झाल्यानंतर समजणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागून राहली आहे.

कधी होणार रिलीज ?
खिलाडी अक्षय कुमारचा ‘ओएमजी’ (OMG) हा बहुचर्चित सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षयच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत या सिनेमाची गणना होते. आता ‘ओएमजी 2’ हा सिनेमा (OMG 2 Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार शिवदूतच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!