Satara News

Satara News : जिवंतपणीच मरणयातना ! वृद्ध महिलेला पावसातून पायपीट करत झोळीतून नेले रुग्णालयात

547 0

सातारा : जावळी तालुक्यातील (Satara News) शेवटच्या टोकावर दुर्गम गाव म्हणून ओळख असलेलं देऊर या गावातील नागरिकांच्या समस्या आजही गंभीर आहेत.. या गावातील नागरिकांना दळणवळणासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गंभीर आजारी पडलेल्यांना दवाखान्यात नेण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून येथे झोळीची रुग्णवाहिका करून तासभर घनदाट जंगलासह डोंगरदरीतून पायपीट करावी लागते.

काल गावातील 62 वर्षाच्या सोनाबाई लक्ष्मण माने या अचानक गंभीर आजारी पडल्या. त्यांची प्रकृती खालावू लागल्याने (Satara News) त्यांना दवाखान्यापर्यंत नेण्याचा प्रश्न कुटुंबियांसमोर उभा राहिला.. अखेर देऊर वेळे गावचे माजी सरपंच कुजी कोकरे, वनसमिती अध्यक्ष मंगेश माने, पोलीस पाटील बाळकृष्ण आखाडे यांनी मदतीने दोन लाकडांना कपडे, झोळी बांधून त्यात रुग्ण सोनाबाई माने यांना बसवून चौघांनी खांद्यावर घेत घनदाट जंगल आणि डोंगरदरीतून मुसळधार पावसात दीड तासाचे पायपीट करत खाजगी वाहनातून चाळकेवाडी पर्यंत आणि तेथून साताऱ्यात नेण्यात आले.. त्यांच्यावर अजिंक्यतारा या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सरकार आणि प्रशासनाने कितीही देश बदलत असल्याचा गाजावाजा केला तरी “भय इथले संपत नाही” याचा अनुभव येथील नागरिकांना काल आला. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत सरकारला भावनिक साददेखील घातली आहे.

Share This News
error: Content is protected !!