Narendra Modi Rally

SPG Security : पंतप्रधानांना असलेली SPG सुरक्षा नेमकी कशी असते? ती नेमकी कशी कार्य करते?

769 0

कालच पंतप्रधानांचा पुणे दौरा झाला. या दौऱ्यात (SPG Security) 5000 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी कार्यक्रमस्थळी पाेहचण्याच्या मार्गापासून ते अगदी कार्यक्रम स्थळावरील सुरक्षेशी संबंधित नियम स्थानिक पोलिस ठरवतात. आणि पोलिसांच्या निर्णयावर एसपीजी अधिकारी देखरेख ठेवतात.आता हे एसपीजी अधिकारी कोण असतात? त्यांचे काम कसे चालते जाणून घेऊया…

पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी 1981 पूर्वी दिल्ली पोलिसांच्या पोलिस उपायुक्तांची होती. यानंतर सुरक्षेसाठी एसटीएफची स्थापना करण्यात आली. दरम्यान, 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार 1985 मध्ये एक विशेष युनिट स्थापन करण्यात आले, ज्याला विशेष संरक्षण युनिट असे नाव देण्यात आले. या युनिटला पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली. आता हे युनिट देशातील अनेक लोकांना विशेष संरक्षण देते.

एसपीजी सुरक्षेबद्दल बोलायचे तर, एसपीजी कमांडोना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी) चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गुंतलेले सुरक्षा कर्मचारी बिझनेस सूट, स्पेशल ग्लासेस, कम्युनिकेशन ईअरपीस परिधान करतात. याशिवाय कमांडोना खास बंदुका दिल्या जातात, त्या अतिशय अत्याधुनिक गन असून, त्या खास तयार केल्या जातात. कमांडो त्यांच्या सुरक्षिततेसाठी हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट आणि सहकारी कमांडोशी बोलण्यासाठी ते कानात ईअर प्लग किंवा वॉकी-टॉकी वापरतात. एसपीजी जवानांसोबत एनएनएफ 2000 असॉल्ट रायफल्स, ऑटोमॅटिक गन व 17 एम रिव्हॉल्वर यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसपीजीची सुरक्षा व्यवस्था असते. त्यांची संपूर्ण जबाबदारी पीएमओ हाऊसची असते. पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेवर दिवसाला 1 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च होतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!