Raqesh Bapat

Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करून दिली माहिती

685 0

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat Hospitalised) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. राकेशनं नुकताच हॉस्पिटलमधील (Raqesh Bapat Hospitalised) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्याने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तो रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसत आहे. मात्र राकेश नेमका कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

सध्या सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्याच्या हाताला ड्रिप लावलेली दिसत आहे. मात्र, या फोटोत राकेशचा चेहरा दिसत नाही. त्याने हा फोटो इव्हिल आय आणि थर्मामीटरच्या इमोजीसह शेअर केला आहे. राकेश (Raqesh Bapat) हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतच्या (Shamita Shetty) त्याच्या केमिस्ट्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.

राकेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास राकेश हा को तू आशिकी, बिग बॉस 15, बात हमारी पक्की है, कुबूल है, नच बलिए 6 यांसारख्या शोमध्ये दिसला होता. वो तुम बिन, दिल विल प्यार व्यार, कुछ दिल ने कहा, कोई मेरे दिल में है, गिप्पी, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. त्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अस्सी नब्बे पूर सौ या वेब शोमध्ये देखील काम केले आहे.

Share This News
error: Content is protected !!