मनोरंजनव्हिडिओ

Jawan Zinda Banda Song : ‘जवान’ मधील ‘जिंदा बंदा’ गाणं रिलीज

अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची (Jawan Zinda Banda Song) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. या चित्रपटाचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या प्रीव्यूमध्ये शाहरुखचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या जवान चित्रपटामधील ‘जिंदा बंदा’ हे गाणे (Jawan Zinda Banda Song) प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये शाहरुख हा अनेक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.

शाहरुखनं ‘जिंदा बंदा’ या गाण्याबद्दल (Jawan Zinda Banda Song) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखनं लिहिलं, ‘उसूलों पर जहाँ आँच आए टकराना ज़रूरी है,जो ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है। वसीम बरेलवी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की, त्यांनी आम्हाला हा सुंदर शेर किरकोळ बदलासह वापरू दिला. जिंदा हे गाणे इर्शाद कामिल सर यांनी लिहिले आहे. तर या गाण्याला संगीत अनिरुद्ध यानं दिलं आहे.’

‘जिंदा बंदा’ या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसत आहेत. या गाण्यामध्ये शाहरुख हा रेड शर्ट ब्लॅक पँट आणि गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. गाण्याच्या शेवटच्या भागात शाहरुख हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसतो. ‘जिंदा बंदा’ या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर शोबीनं केली आहे. जिंदा बंदा हे गाणं हिंदी भाषेबरोबरच तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये देखील रिलीज झालं आहे. जिंदा बंदा या गाण्याचं तमिळमध्ये वंदा आदम असं नाव आहे तर तेलुगूमध्ये धुम्मे धुलीपेला असं नाव आहे.