चंद्रपूर : जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच चंद्रपूरमध्ये (Chandrapur Tiger) एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका वाघिणीचा (Chandrapur Tiger) मृत्यू झाला आहे. बल्लारपूर-गोंडपिंपरी मार्गावरील कळमना या ठिकाणी ही घटना घडली आहे. आज दुपारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात या वाघिणीचा मृतदेह आढळून आला.
काय घडले नेमके?
वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. मृत्यू झालेली वाघीण अंदाजे 4 वर्षांची आहे. रात्रीच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या वाघिणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. वाघिणीचा मृतदेह विच्छेदनासाठी चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात आणला आहे.