Onkar Bhojane Video

Onkar Bhojane Video: ‘नाही मोठेपणाचा आव रे..’, ओंकार भोजनेच्या नव्या कवितेने जिंकले मन

533 0

अभिनेता ओंकार भोजने हा नेहमी आपल्या हटके कवितांसाठी (Onkar Bhojane Video) तसेच आपल्या भन्नाट कॉमेडीसाठी ओळखला जातो. तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातुन घरघरात पोहचलेला (Onkar Bhojane Video) आहे. काही दिवसांपूर्वी त्याने मोठ्या पडद्यावर आगमन केले होते. तो सरला एक कोटी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नसला तरी त्याच्या भुमिकेचं अन् अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला चाहत्यांच्या संपर्कात असतो.

सध्या त्याचं ‘करून गेलो गाव’ धम्माल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात काम करत आहे. ‘मालवणी’ बोली भाषेतील हा भन्नाट कॉमेडी ड्रामा आहे. ओंकार हा (Onkar Bhojane Video) उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्तम कवी देखील आहे. त्याच्या कविता बऱ्याचदा सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.त्याची अशीच एक कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कवितेचे बोल
“Talent ची आमच्या गावभर चर्चा
नाही मोठेपणाचा आव रे
कुणी निंदा कुणी भी वांदा
चिपळूण आमचं गाव रे”

Share This News
error: Content is protected !!