Shocking Video

Shocking Video : धरणाच्या पाण्यात व्हिडीओ बनवणे बेतले जीवावर

500 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. यामध्ये रील बनवत असताना तरुणाचा पाय घसरला आणि तो धबधब्यामध्ये वाहून गेला होता. ही घटना कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्यावर घडली होती. ही घटना ताजी असताना अजून एक घटना समोर आली आहे. यामध्ये देखील एका तरुणाला नसते धाडस करणे जीवावर बेतले आहे.

काय घडले नेमके?
काही पर्यटक फिरायला गेले आहेत. ते मस्त धरणाच्या पाण्यात उभे राहून निसर्गाचा आनंद लुटत आहेत. काहीजण व्हिडीओ बनवण्यामध्ये व्यस्थ असलेले पहायला मिळत आहे. तेवढ्यात एक लाट येते. त्यानंतर व्हिडीओ बनणारे बाजूला जातात. लाटेचा वेग एवढा असतो की यामध्ये एक व्यक्ती वाहून जातो. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी काही लोकांनी आपल्याया कॅमेऱ्यात कैद केली आहे.

@malayalees54 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मलेशियातील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!