PMPML

PMPML : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त PMPML बसमार्गांमध्ये तात्पुरता होणार बदल

786 0

पुणे : पुणेकारणांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 1 ऑगस्टला दुपारनंतर शहरातील काही पीएमपीएल (PMPML) बसच्या बसमार्गांमध्ये (PMPML) बदल करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्यामुळं मध्यवस्तीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ बसच्या मार्गांमध्ये होणार बदल
बस मार्ग क्र. 2, 2 अ, 3, 4, 10, 11, 11 अ, 11 क, 12, 13, 15, 17, 20, 21, 26, 28, 30, 37, 42, 47, 50, 52, 52 अ , 64, 64 म, 66, 68, 69, 70, 71, 72, 78, 89, 90, 103, 111, 117, 118, 118 अ, 119, 216, 227, 227 अ, 231, 232, 233, 233 अ, 233 ब, 294, 295, 297, 298, 299, 339, 354
या बस जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी रस्ता बंद झाल्यास ही वाहतूक दुपार पाळीमध्ये नारायण टॉकीजकडून डाव्या बाजूस वळवून मित्र मंडळ चौक, सारसबाग मार्गे सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यास बस खंडोबा मंदीर, पार्वती पायथा येथून सुटतील आणि रस्ता सुरु झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बस स्थानकामधून सुटतील.

या बदलाची प्रवासी नागरिकांनी नोंद घ्यावी आणि परिवहन महामंडळास सहकार्य करावे,असे आवाहन पीएमपीएमएल (PMPML) कडून करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide