BJP National Executive : भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर; पंकजा मुंडेकडे दिली ‘ही’ जबाबदारी
पुणे : भाजपकडून नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची (BJP National Executive) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 38 जणांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या तीन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/0aaArxHF30
— BJP (@BJP4India) July 29, 2023
यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्षपदी 13 जण, राष्ट्रीय महामंत्री 8 जण, राष्ट्रीय महामंत्री संगठन 1, राष्ट्रीय सह संगठन महामंत्री 1, राष्ट्रीय सचिव 13, कोषाध्यक्ष 1 आणि सह कोषाध्यक्ष 1 यांचा समावेश आहे. या यादीमध्ये पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
