Buldhana Accident

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

1145 0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana Accident) मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक 6 वरती दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्याने हा भीषण अपघात (Buldhana Accident) झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडला आहे.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 6 वरती समोरासमोर आल्या आणि एकमेकांना धडकल्या. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर त्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या भीषण अपघातत (Buldhana Accident) 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि तातडीने मदत कार्याला सुरुवात केली. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!