Pune Sinhagad Road Accident

Pune Sinhagad Road Accident : डंपरखाली येऊनही महिला थोडक्यात बचावली; पुणे सिंहगड रोडवरील घटना

840 0

पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोडवर एक अपघात झाला आहे. सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेलं उडवले आहे. ही महिला झेब्रा क्रॉसवरून जात होती. यावेळी महिला डंपर खाली आली. तरीही डंपर चालकाला महिला दिसली नाही. डंपर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली. यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं.

सुदैवाने त्या महिलेला जास्त गंभीर दुखापत झालेली नाही. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यादरम्यान हा संपूर्ण अपघात त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!