Nashik News

Nashik News : देव तारी त्याला कोण मारी ! 3 वर्षांचा चिमुकला 4 थ्या मजल्यावरून पडूनदेखील थोडक्यात बचावला

932 0

नाशिक : लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नाशिकमधील (Nashik News) एका घटनेतून समोर आला आहे. यामध्ये एक चिमुकला चौथ्या मजल्यावरून पडूनही सुखरूप असल्याचे समोर आले आहे. ही घटना नाशिकरोड (Nashik News) पूर्व भागातील चेहडी पंपिंग या भागामध्ये घडली आहे.

काय घडले नेमके?
नाशिकरोड येथील पूर्व भागातील चेहेडी पंपिंग परिसरातील भगवा चौक परिसरातील साई आदेश सोसायटीत राहणारा तीन वर्षांचा शिवांश पुरुषोत्तम गोरडे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास झोपलेला असल्याने घराचा दरवाजा लावून आई पुनम या मुलीला क्लासला सोडविण्यासाठी गेल्या होत्या. थोड्या वेळाने शिवांशला जाग आली, झोपेतून उठून तो गॅलरीत आला, मात्र यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. मात्र दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीवर दोन फूट रुंद पत्र्याच्या छतावर आदळल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर तिथून खाली पेव्हर ब्लॉकवर धाडकन पडला.

ही घटना चौथ्या मजल्यावरुन पडल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवांश बेशुद्ध अवस्थेत असताना दिपक गुरव, अनिल दराडे, बबलू ताजनपुरे आणि नागरिकांनी तातडीनं त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या चिमुकल्यांच्या घरच्यांच्या जिवात जीव आला.

Share This News
error: Content is protected !!