Suicide

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

715 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक खबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी बी.एससीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. पुण्यातील (Pune News) वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ओम कापडणे (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

ओम कापडणे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी होता. तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तर विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता. याच ठिकाणी त्याने काल गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच ओम कापडणेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओमने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. वाय वसतिगृहात ज्या खोलीत त्याने गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!