मनोरंजन

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रावर केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपण सगळेच ओळखता. त्यांचे लाखो चाहते आहेत. अमिताभ हे अजूनही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग शेअर करत ते (Amitabh Bachchan) सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या पोस्टमुळे अनेकवेळा चर्चेत असतात. सध्या अमिताभ बच्चन यांची एक जूनी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

काय आहे ती पोस्ट?
अमिताभ यांचं 13 वर्षे जून एक ट्वीट आहे जे अनेकांच्या नक्कीच लक्षात असेल. त्यांनी हे ट्वीट 12 जून 2010 मध्ये केलं होतं. अमिताभ यांनी त्यांच्या या ट्वीटमध्ये स्त्रीयांच्या अंतर्वस्त्रावर कमेंट केली होती. त्याचं हे ट्वीट आता पुन्हा एकदा व्हायरल झालं असून अनेकांना सोशल मीडियावर प्रश्न पडला आहे की बिब बी सोशल मीडियावर असं कसं ट्वीट करू शकतात. अमिताभ या ट्वीटमध्ये म्हणाले होते की ‘इंग्रजी भाषेमध्ये ब्रा हा शब्द एकवचनी तर पॅण्टी हा शब्द अनेकवचनी का आहे?’ अमिताभ बच्चन यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/iUtkrshNeil/status/1684205321202413571

अमिताभ यांच्या (Amitabh Bachchan) कामाविषयी बोलायचे झाले तर ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऊंचाई आणि गुडबाय या चित्रपटांमध्ये दिसले होते. आता त्यांच्याकडे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा ‘गणपत’ हा चित्रपट आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबतचा ‘कल्‍क‍ि 2898 AD’ हा चित्रपट आहे. तर त्याशिवाय ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये देखील ते झळकणार आहेत.