Heavy Rain

Rain Update : मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात पडला ‘एवढा’ मिमी पाऊस

951 0

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ (Rain Update) घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. या पावसाचा (Rain Update) फटका शेतकऱ्यांनासुद्धा बसला आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईतील जुलै महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. चर्चगेट, मरीन लाइन्समध्ये रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादर, माटुंगा, किंगसर्कल, लालबाग, अंधेरी, कुर्ला या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती आहे. या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईतील अतिवृष्टीने (Rain Update) जुलै 2020 मधील 1,502.6 मिमीचा विक्रम मोडला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण 1512.7 मिमी पाऊस झाला असून, यंदाच्या जुलै महिन्यात पावसाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जुलै 2005 मध्ये एकूण 1454.4 मिमी पाऊस पडला होता. या महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 58 मिमी कमी आहे.

Share This News
error: Content is protected !!