Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात येणार ब्लॉक

542 0

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवार 27 जुलै रोजी दुपारी 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद राहणार आहे तर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू राहणार आहे.

तीन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्यानंतर काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरड हटवण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता 27 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 पर्यंत मुंबई एक्सप्रेस वे बंद असणार आहे. अजूनही एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी दगड अडकले आहेत. ते धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे असे दगड काढण्यासाठी हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे दुपारी 2 तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद ठेवला जाणार असल्याची माहिती बोरगाट महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी सांगितले आहे. या अगोदर 23 जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यावेळी दगड-मातीचा ढिगारा महामार्गावर आला होता.

Share This News
error: Content is protected !!